*महात्मा बसवेश्वर अखंड भारताचे समतेचे प्रणेते*!
लेखक डॉ-कुमार लोंढे
मो.9881643650
● *सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली -अध्यक्ष*●
महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकातील आधुनिक विचारसरणीचे क्रांतिकारक व विज्ञानवादी संत होय.त्यांचा जन्म कर्नाटकातील असला तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात बत्तीस वर्ष त्यांनी वास्तव केले त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे महत्वाचे आहे
१) *वर्णव्यवस्थेवर प्रहार*-
चातुरवर्ण व्यवस्थेवर व धर्मावर प्रहार करताना ते म्हणतात
चांभार उत्तम तो दुर्वास
कश्यप लोहार,कौंडिण्य तो न्हावी
तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती
जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार
यावरून जाती श्रेष्ठत्व ते नाकारून हा वेडेपणा आहे हे ठणकावून सांगतात
२) *लोकशाहीचे पुरस्कर्ते*-
समता,न्याय,मूल्य,बंधुता,एकात्मता ,
स्वातंत्र्य, अधिकार याचा पुरस्कार करण्याकामी लोकशाही संसदेची स्थापना सर्व जाती धर्माच्या लोकांकरिता केली व समाजहिताच्या हितकारक गोष्टी करण्यास प्राधान्य दिले
३) *स्त्रियांचे अधिकार*
त्यांनी ऐक्य साधण्याच्या हेतूने अनुभव मंडप ही संस्था स्थापन्न करून जन्म,जात,व्यवसाय,स्त्री-पुरुष असा भेद न करता स्त्रियांना ही मुक्त प्रवेश होता हे विशेष धोरण स्त्री अधिकाराबाबत जाणवते.
४) *श्रम प्रतिष्ठा*
मनापासून केलेले प्रत्येक कार्य हे शिव उपासना असून शारीरिक श्रम व व्यवसाय करणे गरजेचे असून श्रमाची प्रतिष्ठा वाढवली त्यांनी परिश्रम हेच शिव व कैलास आहे हे रुजवले
५) *आंतरजातीय विवाह-*
आज आज आपण पाहतो आहोत एकविसाव्या शतकात सुद्धा आंतरजातीय विवाह हे स्वीकार्य होत नाहीयेत यावरून कित्येक घटना व गंभीर परिणाम घडत आहेत परंतु त्यांनी राज्य सत्तेला आव्हान देऊन मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांचा आंतरजातीय विवाह घडवून आणला हे धाडसी कार्य बाराव्या शतकात करणे म्हणजे जातीयतेला मूठमाती देणे होय
६) *अंधभक्ती*
समाजमनाच्या अंध भक्तीवर ते कडाडून प्रहार करतात गळ्यात मनी, भस्म ,गंध ,टिळा लावून उपयोग होत नाहीये तर त्याकरता मन शुद्ध असावे लागते आणि असे नसेल तर तो केवळ देखावा आहे असे ते मानतात
देवाला दूध लोणी तूप अर्पण करणारे अंधभक्त यासंबंधी ते म्हणतात-
दूध ते उच्छिट वासराचे
पाणी ते मत्स्याचे उच्छिट त्याचे
पुष्प ते उच्छिट भ्रमराचे
साधन पूजाचे चे काय सांगा
असे उष्टे साधन देवाच्या पूजेचे साधन होते काय यावरून अंधभक्ती वर त्यांनी कडाडून टिका केली
७) *दैववाद*
दगडाचा देव नव्हे!
मातीचा देव नव्हे!
वृक्ष देव देव नव्हे!
हे सेतुबंध रामेश्वर!
अण इतर क्षेत्राचा!
देव देव नव्हे !
देव तुमच्या अंतर्यामी!
अशाप्रकारे देव व व्यवस्थे वरती प्रश्नचिन्ह निर्माण केले.विज्ञानवाद हा चिकिस्तक पणे स्वीकार्य होणे अपेक्षित आहे हाच संदेश दिला
८) *लिंगायत धर्मावर ब्राह्मणी वर्चस्व*-
लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णा यांचीशिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही ब्राह्मणी वर्चस्वाने या धर्मावरती आपला पगडा अबाधित ठेवला आहे लग्नाचे मुहूर्त धार्मिक कार्य लिंगायत लोक ब्राह्मण व्यक्तीकडून करून घेतात याचा अर्थ या धर्माचे ब्राह्मणीकरण झाले आहे असे म्हणण्यास प्रमाण आहे
कर्मकांड ,देव ,भविष्यवाणी अंधश्रद्धा आत्मा ,वेद ,पुराण, स्वर्ग ,देव-देवता, पुनर्जन्म ही सर्व थोतांड नाकारण्याचे धाडस महात्मा बसवेश्वर यांनी केलेले आहे .
आधुनिक युगातील प्रत्येक युवकास व जाती-धर्माच्या समूहास हे तत्वज्ञान म्हणजे आयुष्याला चिकिस्तक पणे आणि बुद्धिप्रामान्याच्या जोरावर सामोरे जावून आचार आणि विचार रुजवणे हेच खरे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आपण सर्व भारतीयांनी प्रण करणे महत्त्वाचे आहे.
Copyright©2021| www.jan video hi.com
(लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय लेख छापू नये अन्यथा copyright चे उल्लंघन होईल-नावसाहित शेअर करू शकता)