संभाजी महाराज जयंती व अक्षय तृतीता सणानिमित्त गोरगरिबांना गुळ दाळ, आंबे धान्य वाटप !
अकलूज प्रतिनिधी/
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच अक्षयतृतीया सणाचे तसेच शिवसेना कोंडबावी शाखा प्रमुख दत्ताभाऊ साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकलुज शहर युवासेनेच्या वतीने गोरगरिबांना आंबे, गुळ, दाळ,गहु हे धान्य वाटप करण्यात आले.सध्या कोरोना महामारीमुळे हातावर पोट असणारी कष्टकरी जनता हतबल झाली आहे.आर्थिक दृष्टीने कमजोर झाली आहे.एखादा सण साजरा करायचा ठरवल तरीही प्रचंड आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. शिवसेनेचे धोरण 80 % समाजकारण आणि 20 % राजकारण लक्षात घेऊन अक्षयतृतीया सण गोरगरीब जनतेला साजरा करता यावा यासाठी युवासेना अकलुज शहरप्रमुख शेखरभैय्या खिलारे यांनी 4 किलो गहू,अर्धा किलो हरभराडाळ,अर्धा किलो गूळ,अर्धा किलो तांदूळ व 5 आंबे आशा पद्धतीचे किट तयार करून 85 किटतयार करून गोरगरीब जनतेला अकलुज परिसरात फिरुन वाटले. ही मुळ संकल्पना शिवसेनेचे माजी माळशिरस तालुकाप्रमुख पै.स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांची आहे.आप्पांच्या काळात माझे वडील राजाभाऊ खिलारे,नामदेवनाना वाघमारे,दत्ताआबा पवार,आण्णा कुलकर्णी हे अकलुज शहरातील गोरगरिब जनतेला अक्षयतृतीया सणासाठी धान्य वाटत होते.शिवसेनेच्या कार्यात अजून मोठ्या प्रमानात भर पडावी यासाठी इथून पुढे युवासेनेच्या वतीने आम्ही हा वारसा पुढे जपत आहोत असे शेखर खिलारे यांनी बोलताना सांगितले या कार्यक्रमासाठी बिपीन बोरावके,करण कांबळे, हिरा (ठाकूर) खंडागळे,दीपक बाबर,सागर साळुंखे चैतन्य गायकवाड यांनी परिश्रम घेतले.सदरचे किट महषीँ कालनी सह अकलुज परिसरात वाटप करण्यात आले ते घेण्यासाठी महिलां उपस्थित होत्या.