*माळशिरस तालुक्यातील हॉस्पिटलसाठी ऑक्सीजन वाढवून मिळावा युवासेनेची मागणी*
माळशिरस तालुका हा वैद्यकीय दृष्ट्या सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे माळशिरस तालुक्याच्या आस-पास तालुक्यातील ( मंगळवेढा,सांगोला,करमाळा,पंढरपूर ,इंदापूर, म्हसवड ) येथून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. व माळशिरस तालुक्यात सुद्धा जास्त पेशंट असल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी पडत आहे.त्यामुळे बेड मोकळे राहत आहेत तरी त्वरित माळशिरस तालुक्यातील सर्व हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन पुरवठा वाढवून मिळावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे व अकलुज शहरप्रमुख शेखरभैय्या खिलारे यांनी निवेदनाद्वारे शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार तानाजीराव सावंत साहेब व शिवसेना जिल्हा समनवयक शिवाजीराव सावंत साहेब यांच्याकडे पंढरपूर येथे केली .हि मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली त्यावेळी जितेंद्र महाडिक,अजिंक्य पासगे,नाना हनुवते उपस्थित होते.
आपला
शेखर राजाभाऊ खिलारे
युवासेना शहरप्रमुख अकलुज