12 मई, 2012
(निश्चय के अनुसार 18 महिनों के बाद अफसर बनकर रैली के साथ गांव लौटा था वह दिन)
१२ मे, २०१२..
काही दिवस न विसरण्यासारखे असतात. १२ मे, २०१२ हाही असाच माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस. २०१० सालच्या यू.पी.एस.सी. च्या पूर्वपरीक्षेत अपयश आल्यानंतर काहीसा निराश झालो होतो. त्यातच घरच्या अर्थिक परिस्थितीमुळे पुणे सोडावं लागल होतं. यात भर म्हणजे ऑक्टोबर २०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आईचा पराभव झाला . माणसाला सातत्यानं अपयश आल्यानंतर दोनच गोष्टी घडतात. एकतर तो खचून जातो किंवा खूप काहीतरी मोठं करायचं ठरवतो. मी काहीतरी मोठं करण्याचा निर्धार केला. ‘आता गावात परत येईन ते क्लासवन अधिकारी झाल्यानंतरच आणि तेही मिरवणुकीने!’ असा निर्धार करून २३ ऑक्टोबर २०१० ला गावातून बाहेर पडलो होतो.
केलेल्या निर्धाराला सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. आणि ठरविल्याप्रमानं बरोबर ६ वर्षांपूर्वी म्हणजेच १२ मे, २०१२ ला गावात पुन्हा पाऊल ठेवलं होतं…तेही मिरवणूकीनं….!
#UPSCResult
#9yearsago
Ithe Thambane Nahi
#RameshGholap