प्रतिनिधी/ मोहन करडे
माळशिरस तालुक्यातील गारवाड मगरवाडी येथे आज रोजी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि पावसामध्ये मगरवाडी आणि गारवड येथे वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेल आहे. या नुकसानी मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून मगरवाडी येथील अशोक मुरलीधर मगर यांची एक शेळी मरण पावली आहे.तर गारवाड येथील बाळू सुखदेव मगर यांची वीज पडून म्हैस मरण पावली आहे
याबाबत गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील , उपसरपंच यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पंचनामा केलेला आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्यामुळे गारवड मगरवाडी मधील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.