– कोरोना रुग्णाच्या मृत्यूने प्रकरण उघडकीस
– तहसिलदार, आरोग्य अधिका-यांच्या निर्देशाअंती क्लिनिक बंद.
– डॉ. अतुल सुरजागडे पुर्वी पासून चालू होते लंदफंद.?
– वरिष्ठ अधिकारी योग्य कारवाई करण्यात यशस्वी होणार.?.
अधिकारी मॅनेज होणार असल्याची गावात चर्चा.?
अनेक ठिकाणी अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरला हा डॉक्टर.
मुंबई. विभागीय प्रतिनिधी दि. ९. मे २०२१:-
गडचिरोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचा फायदा घेत शासकीय सेवेत असतानाही स्वताच्या घरी खासगी रुग्णालय चालू करुन त्यात परिसरातील आणि गडचिरोली शहरात राहाणाऱ्या शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या अनधिकृत कोविड केअर केंद्राचा शुक्रवार, 7 मे रोजी अधिकाऱ्यांनी भंडाभोड केला असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. तालुक्यातील हिवरगाव येथील डॉ.अतुल सुरजागडे यांच्या अनाधिकृत कोविड केंद्रात उपचार घेत असलेल्या एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्याने सदर प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान तहसिलदार व आरोग्य अधिका-यांच्या निर्देशाअंती मोका पंचनामा करीत सदर अनाधिकृत क्लिनिक बंद करण्यात आले आहे. तरीही लंदफंद आणि स्वार्थीपणासाठी चतुर असलेल्या डॉ. अतुल सुरजागडे यांच्या आमिषाला कारवाई करणारे अधिकारी बळी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील तळोधीवरून 2 कि.मी अंतरावर कुनघाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या हिवरगाव या गावात डॉ. अतुल सुरजागडे हे आपल्या राहत्या घरी क्लिनिक उघडून रोज शेकडो रुग्णांची तपासणी करायचे. विशेष म्हणजे डॉ. सुरजागडे हे भाडभिडी (मो.) येथे कंत्राटी पध्दतीने शासकीय सेवेत असताना सुद्धा कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता आपल्या राहत्या घरी रोज अनेक रुग्णांवर उपचार करीत होते. या दवाखान्यात उपचार घेतलेल्या मात्र स्थिती गंभीर झाल्यानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असतांना हिवरगाव येथील बंडू बारसागडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. तेव्हाच हे प्रकरण उघडकीस आले. तोपर्यंत अतुल सुरजागडे नावाच्या लंदफंद डॉक्टरने किती रुग्णांची तपासणी करून जिव घेतले याचा अंदाज नाही. या बाबत सखोल चौकशी सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी एकमेकांशी संवाद करतांना सांगितले आहे.
मृतकाची पत्नी निरंजना बारसागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून पती आजारी असल्याने त्यांना गावातीलच डॉ. अतुल सुरजागडे यांच्या क्लिनिकमध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी उपचारासाठी नेले. उपचारा दरम्यान डॉ. सुरजागडे यांनी रुग्णाची एक्स रे काढून रक्त तपासणी केल्यानंतर उपचार करणार असल्याचे सांगितले. दरम्यान गडचिरोली येथून एका खासगी रुग्णालयातुन एक्स रे काढून आणले. त्यानंतर डॉ. अतुल सुरजागडे यांनी क्लिनिक मधील आपल्याच पत्नीच्या ( दुसरी की तिसरी,की चौथी?माहीत नाही जनतेची चर्चा) लॅब मध्येच रक्त तपासणी केली असता रुग्णाला न्युमोनिया झाल्याचे डॉ.सुरजागडे यांनी निदान झाले. मात्र उपचार करुनही रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा न होता ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले. डॉ. सुरजागडे यांनी मीच ऑक्सीजनची व्यवस्था केली असून यासाठी 50 हजार रुपये लागतील, असे सांगितले होते. .3 तारखेला रुग्णास ऑक्सिजन लावले. मात्र ऑक्सिजन संपल्याने कुटूंबियांनी रुग्णास गडचिरोली येथे हलविण्याची परवानगी मागितली. दुस-या दिवशी गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णाची चाचणी केली असता रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र उपचारास बराच उशीर झाल्याने 5 मे रोजी रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. यानंतर गावकृती समितीसह प्रशासकीय स्तरावरुन मोका चौकशी कारवाई होईस्तवर सदर अनाधिकृत रुग्णालयाला ताला ठोकला. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली असून संबंधित डॉक्टरावर प्रशासन स्तरावरुन कोणती कारवाई होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. डॉ. अतुल सुरजागडे यांच्या हलगर्जीपणामुळे आणि पैसे कमविण्यासाठी सुरू असलेल्या हव्यासापोटी मृत्यू झाला आहे.
मृत बंडू सुराजगडे यांची तब्येत नाजूक असतानाही शिवाय ऑक्सिजनची आवश्यकता असताना देखील डॉ. सुरजागडे यांनी रुग्णास सामान्य रुग्णालयात पाठवण्याबाबत काहीच सल्ला सांगितला नाही. उलट आमच्याकडून ( रुग्णाच्या नातेवाईक) 20 हजार रुपये डॉक्टरने उकळले. डॉ. सुरजागडे यांच्या हलगर्जीपणामुळे पतीचा जीव गेला असल्याचा आरोप
निरंजना बारसागडे
( मृतकाची पत्नी,) हिवरगाव यांनी केला आहे.
गावकृती समितीसह प्रशासनाने केली मौका चौकशी?.
5 मे रोजी कोरोना रुग्ण बंडू बारसागडे यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. यानंतर 6 मे रोजी हिवरगाव येथील डॉ.अतुल सुरजागडे यांच्या खासगी क्लिनिकला गावकृती समितीने प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करीत मोका पंचनामा केला. याचा लेखाजोखा प्रशासन स्तरावर पाठविण्यात आला. यात काही घोळ तर नाही??या प्रकरणाची गंभीर दखल घेत 7 मे रोजी तहसिलदार जितेंद्र शिकतोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबार, गट विकास अधिकारी डॉ. सागर डुकरे, सरपंच, पं.स.सभापती भाऊराव डोर्लीकर, पोलीस पाटील, तलाठी यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी यांनी क्लिनिकला ताला ठोकला असला तरी या प्रकरणी फार मोठी सेटिंग केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यात किती अधिकारी सेटिंग वर मॅनेज होणार आहेत?
<तपासाअंती करणार कारवाई??
आणि किती दिवस तपासणी करण्यात येईल?
विसापूर (रै.) येथील गावकृती समिती तथा सरपंच यांनी शासकीय सेवेत असलेले डॉ. सुरजागडे यांच्या हिवरगाव स्थित खासगी क्लिनिकमध्ये अवैधरित्या कोरोना रुग्णावर उपचार करतांना रुग्णाचा मृत्य झाल्याबाबत मोका पंचनामा करुन तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत सदर दवाखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी रुग्णालयात अनेक रुग्ण असल्याचे आढळून आले. आरोग्य विभागाकडून चौकशी होईपर्यंत सावधगिरी म्हणून दवाखाना सील करण्यात आला आहे. संपूर्ण कारवाई तपासाअंती करणार असल्याची माहिती चामोर्शी चे तहसीलदार
जितेंद्र शिकतोडे यांनी दिली.. तहसीलदारही या लंदफंद डॉक्टरांनी सांगितले तसे मॅनेज होणार तर नाही ना?? अशा अनेक ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून शंका व्यक्त केल्या जात आहेत. हे विषेश.!