माळशिरस तालुक्यातील लसीकरण उपकेंद्र किंवा गावनिहाय अजय सकट यांची करण्याची मागणी
प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील लसीकरण उपकेंद्र किंवा गावनिहाय पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते अजय सकट यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे
तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
उपरोक्त विषयास अनुसरून आपणाकडे निवेदन करतो कि, सध्या कोवीड लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मारामारी तसेच वाद होत आहेत. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नाही तरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 76 आरोग्य उपकेंद्रात अथवा गावात लसीकरण झाले तर सर्वसामान्यांना त्रास होणार नाही तसेच लसीकरण सुरळीत होईल. व प्राथमिक आरोग्यबकेंद्रातील सर्व गावांना याचा फायदा होणार आहे. तरी प्रांताधिकारी आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ आदेश देऊन उपकेंद्रा निहाय लसीकरण करावे या मागणीसाठी जनतेतून जोर धरला जात आहे