जनविद्रोही प्रतिनिधी/
सेंट्रल ह्यूमन राइट्स च्या उस्मानाबाद जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी अल्ताफ मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या सामाजिक कार्याची आवड,लोकसंपर्क व ग्रामीण भागात विविध प्रश्नांवर केलेलं काम पाहून त्यांची निवड करण्यात आली.
सेंट्रल ह्यूमन राइट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्काच्या संदर्भात काम करत असून राज्यघटनेतील मूलभूत अधिकार ,अन्याय ,अत्याचार इ संदर्भात कार्यरत असून या राष्ट्रीय स्तरावरील काम करणाऱ्या सेंट्रल ह्यूमन राईट च्या पदावर काम करण्याची संधी अल्ताफ मुजावर (MD) यांना मिळत आहे.
सेंट्रल ह्यूमन राईटचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे व गव्हर्निंग बॉडी यांच्या आदेशाने सदरची निवड करण्यात आली आहे.त्याबाबतचे अधिकृत नियुक्ती पत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना सुभेच्छा दिल्या.