आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मा. लक्ष्मण मोटे साहेब यांना पूत्र शोक…
आटपाडी तालुक्यातील पहिले वन अधिकारी (RFO) अनिकेत लक्ष्मण मोटे यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू…
आटपाडी तालुक्याचा कोहिनूर हरपला.
अध्यक्ष, राजेंद्र खरात
====================
सांगली जिल्हा प्रतिनिधी:- प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे. आटपाडी. दि. ६. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण मोटे साहेब यांचे ज्येष्ठ पुत्र अनिकेत लक्ष्मण मोटे. यांचे चंद्रपूर येथे आज पहाटे कोरोनाच्या संसर्गाने दुर्दैवी निधन झाले.
त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा ,वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता आटपाडी मध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त झाली.
मोटे साहेब यांच्या कुटुंबावर झालेला हा मोठा अनपेक्षित आघात आहे. अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन व राज्यसेवेची परीक्षा पास होऊन अनिकेत मोटे हे आटपाडी तालुक्यातील पहिले वनाधिकारी ठरले होते. त्यांच्या यशामध्ये मोटे कुटुंबियांचे मोलाचे योगदान होते. आज त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी, आटपाडी ची सर्व जनता, आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते, अभ्यासक, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, रिपब्लिकन पक्षाचे येथील आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. अनिकेत मोटे यांच्या रूपाने आटपाडी तालुक्यातला कोहिनूर हरपला…. अशी भावनिक प्रतिक्रिया अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.