*डॉ सागर राऊत यांचे कार्य कौतुकास्पद -धैर्यशील मोहिते-पाटील*
माळशिरस प्रतिनिधी : युवराज नरुटे(9011394020)
पिलीव सारख्या गावातून डॉ.सागर राऊत यांनी कोव्हीड केअर सेंटर सुरू केले हि अभिमानास्पद बाब आहे.यामुळे अकलूज, माळशिरस, नातेपुते, पंढरपूर, मधील हॉस्पिटल वरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत पिलीव येथील *राऊत हॉस्पिटल* मध्ये खाजगीरित्या सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संघटक सरचिटणीस *धैर्यशील मोहिते-पाटील* यांनी व्यक्त केले.यावेळी कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते फीतकापून करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर पिलीव गावचे सरपंच नितीन माळी,डॉ.संतोष माने देशमुख,डॉ.दिलीप पवार,भाजपा नेते राहूल मदने,पर्यवेक्षक राजू शेख,शिवामृत दूध संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर,दादासाहेब शिंगाडे पिलीवगावचे उपसरपंच संजय आर्वे,मंत्रालय सहाय्यक भारत बिडे,संग्राम पाटील राजेंद्रसिंग जामदार,ज्ञानेश्वर माळी,संजय राऊत,तंटामुक्तीचे अध्यक्ष दामोदर लोखंडे,समशेरसिंग राजपूत,विनोद तावरे,संतोष करडे,सर्व पत्रकार व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.यावेळी R.M.Organic व Pro.Organic चे मालक राहुल मदने यांनी या कोव्हीड केअर सेंटरला उपयुक्त असे पीपीई किट,सॕनिटायजर व इतर उपयुक्त साहित्य मदत म्हणून दिले.यावेळी हॉस्पिटल बद्दल व कोव्हीड केअर सेंटर बद्दल डॉ.राऊत यांनी सांगितले कि या सेंटरमध्ये एकूण दहा बेडची सोय करण्यात आली आहे.त्यापैकी इमर्जन्सी साठी दोन बेड ऑक्सिजनचे ठेवण्यात आले असून या ठिकाणी अत्यंत अल्प दरात औषध उपचार केले जातील.
डॉ.सागर राऊत हे आपल्या सेवेमुळे व अचूक निदान करण्यामुळे अल्पावधीतच प्रसिद्धीस आले आहेत. पिलीव मध्ये स्वताच्या हॉस्पिटलमध्ये कोव्हीड केअर सेंटर सुरु केल्याने पिलीवसह परिसरातून डॉ.राऊत यांचे कौतुक होत असून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या कार्यास जनविद्रोही न्यूज परिवाराकडून हार्दिक हार्दिक असे अभिनंदन.