माळशिरस प्रतिनिधी : युवराज नरुटे(9011394020)
तरंगफळ गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असूनही तरंगफळ गावातील लोकांना मांडकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते, जाणे येण्यासाठी वाहनांची सोय होत नाही.
हे लक्षात घेऊन लसीकरण तरंगफळ मधेच व्हावे यासाठी डॉ. महादेव वाघमोडे यांनी डॉ. रामचंद्र मोहिते तालुका आरोग्य अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले, आमच्याकडून कोणतीही अडचण येणार नाही.
डॉ.भोसले मांडकी केंद्राचे अधिकारी यांनीही तुमच्या गावामध्ये लसीकरनासाठी एक दिवस देऊन लसीकरण करू असे आश्वासन दिले.
त्या प्रमाणे आज दि 5.5.2021 ला 108 जणांचे लसीकरण श्री सिध्दनाथ हायस्कूल तरंगफळ मध्ये पार पडले.
डॉ महादेव वाघमोडे यांनी त्यांचे काम पहात असताना आपण गावासाठी काहीतरी करण्याची हीच खरी वेळ आहे असे समजून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले ते सध्या सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांना मोलाचे सहकार्य पत्रकार युवराज नरुटे यांचे लाभले.
कार्यक्रमच्या उदघाटन प्रसंगी तरंगफळ गावचे सरपंच ज्ञानेश्वर कांबळे , माजी उपसरपंच रमेश तानाजी तरंगे , पानसरे ग्रामसेवक,संतोष शेंडगे सर, ग्रामपंचायत सदस्य महादेव गोरड उपस्थित होते.
लसीकरण करून घेण्यासाठी तरंगफळ गावचे पोलीस पाटील जयसिंग साळवे सर, गोविंद कांबळे, रसूल मुलाणी तसेच आरोग्य कर्मचारी एल.ए. श्रीराम , विकास मगर(CHO) , अक्षय जाधव , व्ही एस दनाने, रमेश बंडगर, आरोग्यसेवक यांनी काम केले.