प्रतिनिधी
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व च सामाजिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत . या मध्ये आणखी एक नाव म्हणजे एनजीओ बचाव अभियान चे राज्याचे मुख्य समन्वयक तथा अराध्या एनजीओ सपोर्ट सेंटरचे संस्थापक राहुल ढवाण.
कोरोना विषाणू च्या अवघड प्रसंगी त्यांचे राज्यभरात मदतीचे काम चालू असल्याचे पाहावयास मिळत आहे .
गेल्या काही दिवसापासून रोज अनेक कोरोना पेशन्टला त्यांनी वेगवेगळी मदत केली आहे .
नुसत्या मोबाईल कॉलवरून पेशन्टला प्लाझ्मा, बेड- ऑक्सीझन बेड, व्हेंन्टीलेटर बेड, शासन नियमानुसार इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न, मेडिकल पर्यत मदत होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली.
त्यांच्या पर्यंत आलेल्या कोणत्याही पेशन्टच्या नातलगाला मदत मिळेपर्यंत ते सहकार्य करत आहेत .
तसेच संकट काळात कोणाला कोणतीही अडचण असू दया आपण सर्वजण मदत करू , पेशन्टचा जीव जाऊ द्यायचा नाही. कारण एका जीवाची किंमत किती अनमोल असते हे फक्त त्याचे नातलग जाणतात अशी भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली. राज्यभरातून सामाजिक संस्था व प्रतिनिधी, हॉस्पीटलस, त्यांच्या सोबत या कार्यात सहभागी झाले आहेत. आपल्यापैकी कोणाला मदतीची गरज असल्यास 7385315925 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करण्याचे तसेच शासनास सहकार्य चे आवाहन करण्यात आलेले आहे.