पिंपरी – भाजप नेत्यांच्या आणि पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तब्बल 26 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल करून तो पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे (वय 34, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 मार्च ते 7 एप्रिल 2021 या कालावधीत बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट आणि ट्विटर अकाउंट यावर घडला आहे.
त्यानुसार पेज CM Devendra Fadanvis Fan Club Posted by Dhananjay Joshi, राजकारण महाराष्ट्राचे posted by राजकारण महाराष्ट्राचे posted by Sonali Rane, भाजप सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र Posted by Madhukar Waghmare, टकलु हैवान, Devendra Fadanvis for Maharashtra या फेसबुक पेज चालविणाऱ्या व्यक्ती
तसेच फेसबुक अकाउंट धारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वम्बर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस जोशी, नाना पंडित, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्विटर अकाउंट धारक Rudraadev , विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.