तालुक्यात ऑक्सीजन व
व्हेंटीलेटर बेड,रेमडिसिव्हर तात्काळ उपलब्ध करणेबाबत उत्तमराव जानकारांनी घेतली पालकमंत्री भरणे यांची भेट
माळशिरस प्रतिनिधी
तालुक्यात ऑक्सीजन व
व्हेंटीलेटर बेड,रेमडिसिव्हर तात्काळ उपलब्ध करणेबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांची अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकार यांनी भेट घेऊन मागणी केली यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समितीचे सदस्य अजय सकट ,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे उपस्थित होते
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
कोवीड 19 चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सीजनयुक्त बेडची समस्या वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत
सध्या माळशिरस तालुक्यात खाजगी व शासकीय हॉस्पीटलमध्ये इतर तालुक्यातील रुग्णांचाही ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माढा, करमाळा, सांगोला, माण, फलटण, इंदापूर, पंढरपूर आदी जवळपासच्या तालुक्यातील कोवीड 19 चे असंख्य रुग्ण अकलूज व परिसरातील हॉस्पीटलमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे ऑक्सीजन व व्हेंटीलेटरबेड व रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. तरी या तालुक्यातील राखीव साठा माळशिरस तालुक्यातील आरोग्य यंत्रणेसाठी आपण योग्य ती दखल घेवून उपलब्ध करुन द्यावा. तरी खालील मागण्यासंदर्भात आपण मा. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचेशी विचारविनिमय करुन तात्काळ या समस्या, अडचणी सोडविण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे त्यात मांडलेल्या विविध मागण्या अशा ,तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड 283 व व्हेंटिलेटर 44 असून तालुक्याची लोकसंख्या जवळपास साडेपाच लाख असून
इतर तालुक्यातील हजारो पेशंटचा ताणही माळशिरस तालुक्यावर येवून पडला आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर बेड व
ऑक्सिजन युक्त बेडची संख्या शासनाने वाढवून द्यावी तालुक्यामध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली असून उपलब्ध असलेला साठा मात्र कमी
पडत असल्याने या इंजेक्शनचा रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे हे इंजेक्शन उपलब्ध करावे ,माळशिरस तालुक्यातील लोकसंख्या 5.50 लाख असून सध्या 1250 लस तालुक्याला दररोज/दिवसाआड मिळत
आहेत. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात त्या फारच कमी असल्याने लसीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यावा,माळशिरस तालुक्यात पिलीव, नातेपुते, वेळापूर, माळशिरस, फोंडशिरस या गावांत ऑक्सिजनयुक्त बेड चे हॉस्पिटल
अथवा डी.सी.एस. निर्माण करावेत. त्याचप्रमाणे कोवीड केअर सेंटर उपलब्ध करुन द्यावे,कोव्हीड सेंटर येथे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील असणार्या वैद्यकीय अधिकार्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत,अकलूज येथे सुरु केलेल्या कोवीड सेंटरमध्ये 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त डी.सी.एच. निर्माण करावेत,माळशिरस तालुक्यात कोव्हीडच्या पेशंटची मृत्युंचे प्रमाण वाढू लागले आहे त्यामुळे स्मशानभुमीच्या अडचणी वाढल्या
आहेत त्यामुळे अकलूज ,माळशिरस, नातेपुते, वेळापूर या प्रमुख गावांमध्ये विद्युत शववाहिनी तत्काळ मंजूर करावी.