स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी दामोदर लोखंडे यांची नियुक्ती
पिलीव /
माळशिरस तालुक्षक्यातील पिलीव येथील दैनिक पुढारीचे जेष्ठवार्ताहर दामोदर लोखंडे यांची राष्ट्रीय पातळीवर कार्यक्षेत्र आसलेल्या स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड केल्याचे नियुक्ती पत्र आँनलाईनद्वारे मिळाले असून. या संघाच्या वतीने पत्रकाराच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व पत्रकाराच्या हितासाठी, कल्याणकारी योजना तसेच पत्रकाराना मानधन, विमाकवच, घरकुल योजना, पत्रकाराच्या पाल्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्रात फीमध्ये सवलती,आदि नविषयासाठी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार, उपाध्यक्ष गौरव शेलार व राष्ट्रीय संपर्क प्रमुखअफसर शेख यांच्या तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत भगत उपाध्यक्ष मिलिंद दळवी व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविणार आसल्याचे दामोदर लोखंडे यांनी यावेळीसांगितले. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून अभिनंदन केले जात आहे