संपत देवगिरे
नाशिक : सध्या देशात सगळीकडेच कोरोनाचा प्रसार व रुग्ण वाढत आहेत. त्यांच्या उपचाराच्या सुविधांवर ताण आला आहे. शासन व स्वयंसेवी संस्था चांगले काम करीत आहेतच. मात्र तेव्हढे पुरेसे नाही. त्यात डॉक्टरांनाही आपले योगदान शक्य आहे. प्रत्येक रुग्णालयाने आपल्याकडील किमान एक ऑक्सीजन सिलेंडर कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णांना दिल्यास ही समस्या दुर होण्यास हातभार लागेल, असे येथील सामाजिक कार्यकर्ते व डॉ राजेंद्र जाधव यांनी सुचविले आहे.
त्यांनी स्वतः आपल्या रुग्णालयातील सिलेंडर देऊन या उपक्रमास सुरवात केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपली पोस्ट व्हायरल केली आहे.
सर्व हॉस्पिटल चालवणाऱ्या मित्र-मैत्रिणींना आवाहन केले आहे. ते म्हणाले, आत्ताच्या घडीला कोविड सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतोय. ऑक्सीजन सिलेंडर कमी आहेत. सी पेप आणि बाय पेप कमी आहेत. व्हेंटिलेटर देखील खुप कमी आहेत. यास्थितीत आपण काही गोष्टी अंमलात आणल्यास नक्कीच ह्या महाकठीण आपत्तीतून बाहेर पडू शकतो.
ते म्हणाले, अवेक प्रोन पोझिशन- पालथ्या पोझिशन मध्ये राहिल्यास ऑक्सिजन कमी लागतो. आपल्याकडील भरलेले ऑक्सीजन सिलेंडर कोविड सेंटरला हलवले तर? किंवा आपल्याकडील सी पेप, बाय पेप कोविड सेंटरला हलवले तर?आपल्याकडील व्हेंनटिलेटर कोवीड सेंटरला हलवले तर?. याचा विचार प्रत्येक दवाखान्याच्या संचालकाने करावा. अशा रीतीने थोडीफार मदत आपल्या डॉक्टर बांधवांना व संकटात अडकलेल्या कोरोना रुग्णांना होऊ शकते. मी माझ्याकडील भरलेले जंबो सिलेंडर पाठवले सुद्धा. सर्व हॉस्पिटल चालवणार्याला मित्र-मैत्रिणींना, माझी कळकळीची विनंती आहे. बघा मदत करता आली तर. मला तरी आत्मिय समाधानाची अनुभूती मिळते आहे.

यासंदर्भात डॉ. जाधव म्हणाले, नाशिक शहरात सध्या चौदाशे हॉस्पीटल्स आहेत. या हॉस्पीटल्सच्या संचालकांकृे किमान चार ते पाच सिलेंडर असतात. त्यातील एक किंवा दोन त्यांनी सध्याच्या अडचणीच्या काळात कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांच्या आपल्या सहकाऱ्यांना दिल्यास त्यांची ऑक्सीजनची समस्या सुटेल. सध्याचा अडचणीचा काळ व कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला की आपले सिलेंडर पुन्हा परत घ्यावेत. त्यातून एका सिलेंडरने एका राष्ट्रीय आपत्तीशी युद्ध करण्यात सर्व हॉस्पीटल्स व डॅक्टर्सचा देखील हातभार लागेल.
…