माणदेशाचा परीस:- हणमंतराव देशमुख
-- डॉ.कुमार लोंढे.चांदापुरी.
(वाढदिवसपर विशेष लेख)
प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे.
आटपाडी. दि. १६. आटपाडी तालुक्याच्या राजकीय व सामाजिक विकासाला प्रभावी पणे हातभार लावणारे व दिशा देणारे, दिघंची सारख्या ग्रामपंचायत वर (अपवाद वगळता) अनेक वर्षे सत्तेचा अंकुश ठेवून दिघंची चा नव्याने कायापालट करणारे, आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये समतामूलक विचारांची जाण असणारी व्यक्ती अशी ओळख असणारे नेतृत्व, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून माणदेशांमध्ये समतावादी विचारांची जी अनेक बिजे रुजली गेली त्या समतावादी विचारांचा वारसा सांगणारे नेतृत्व, आणि पदांपेक्षाही आपल्या कार्य गुरुत्वाच्या प्रभावातून सामान्य माणसाच्या मनात रुजलेले अभ्यासू ,गुणवंत ,व ज्ञानवंत सर्वसमावेशक असं नेतृत्व म्हणजे दिघंची चे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. हणमंतराव देशमुख यांचा काल वाढदिवस साजरा झाला.
त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते व अभ्यासक डॉ. कुमार लोंढे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला साक्षेपी आढावा म्हणजे हा लेख ….मी हा लेख वाचकांसमोर ठेवत आहे…..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक मा. हणमंतराव देशमुख. ( आप्पासाहेब ) आज या असामान्य व्यक्तिमत्वाचा वाढदिवस होय. माणदेशातील आटपाडी तालुका म्हणजे पाचवीला पुजलेला दुष्काळ याच तालुक्यात ,शंकरराव खरात, प्रा. अरुण कांबळे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश तात्या माडगूळकर, इत्यादी थोर साहित्यिकांच्या बरोबरच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले, आणि त्यांच्या प्रेरणेने आपलं आयुष्य जगणारे बौद्धाचार्य नाथाजी पवार व सोपान मोटे इत्यादी व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाने माणदेश प्रसिद्ध झाला. अनेक पाणी परिषदा क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, भाई गणपतराव देशमुख , राजेंद्रअण्णा देशमुख व हणमंतराव देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाल्या.
दिवंगत आर.आर पाटील हे सुद्धा मा.आप्पा चे जवळचे स्नेही. परंतु, कधी ही बडेजाव... आपल्या भाषेत सत्तेची मस्ती वैगेरे काही नाही. कायम दिघंची ग्रामपंचायत वर एक हाती सत्ता ( अपवाद वगळता) असणारे नेतृत्व!
माझा व आप्पाचा संबंध म्हणजे माझे आजोळ दिघची !
या गावामुळे मला माझी स्वतःची अशी ओळख निर्माण करता आली. माझं माळशिरस तालुक्यातील गारवाड हे छोटस गाव. परंतु आटपाडी तालुक्याने मला स्वतःची ओळख दिली. त्यामध्ये बहुजनांचा नेता अरुण भाऊ वाघमारे, माजी सभापती आण्णासाहेब रणदिवे, दिवंगत माझे साडू दीपक सावंत, प्रा.गौतम गायकवाड, ,प्रा.सोमवंशी ,डॉ.चंदनशिवे ,प्रा.लोंढे व अत्यंत जवळचे कराटे प्रशिक्षक संजय होवाळ , पोपट वाघमारे व प्रा.संतोष पवार इ मित्र व मार्गदर्शक लाभले.
त्या अर्थाने मा.हणमंतराव आप्पा हे नेहमी मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. व आधार देण्याचं महत्वपूर्ण कार्य करीत असत. विशेषतः मातंग, महार् व होलर समाजावर त्यांचे विशेष प्रेम. ते अगदी दिवंगत धोंडीसाहेब आण्णा देशमुख यांचे पासून मला आठवते आहे. दिघची च्या बौद्ध समाज मंदिरात आप्पा बोलले होते ” माझी भावकी तुम्ही आहात’ हा मनाचा मोठीपणा त्यांच्याकडे निश्चित आहे.
पाठीवरती हात ठेवुनी फक्त लढ म्हणा
एक असा प्रसंग…. माझी भावकितील चुलत बहिणीचे आटपाडी मध्ये हॉस्टेल ला ऍडमिशन करायचे होते. परंतु राजेंद्र अण्णा यांना भेटून सुद्धा झाले नव्हते. (अरुण भाऊ यांनी खास बाब म्हणून आठवले साहेब यांचेकडून उशिरा करून आणले होते) ही सर्व हकीकत त्यांच्या वाड्यावर जाऊन सांगितली. व तिची आप बिती सांगितली. ( तिच्या वडिलांचा जातीय अत्याचारातून बळी गेला होता) आप्पा नि क्षणाचा विलंब न लावता आम्हाला मार्ग सांगितला ….तुम्ही वाळवा येथे जाऊन क्रांतिवीर नागनाथ आण्णा यांना भेटा.. दुसऱ्या दिवशी आम्ही ( संजय होवाळ) आण्णा च्या कारखान्यावर गेलो. आम्ही वाचमन ला विनंती केली ..लांबून आलोय भेटायचं आहे. त्यावेळी आम्हाला सांगितले अगोदर जेवण करा. तरच आण्णा भेटतील. अन्यत: भेटणार नाहीत…दूध पिऊन आण्णा च्या ऑफिस मध्ये गेलो …पुन्हा आप बिती सांगितली. आणि हणमंतराव देशमुख यांचे सागणेवरून आलो आहे असं सांगितलं . आण्णा नी स्मित हास्य केले …ह्यालों आपल्याकडे एक गरीब मुलीचं ऍडमिशन( प्राचार्य यांना फोन) करा..हणमंतराव नि यांना पाठवले आहे. आणि हो कोणतीच फी त्या मुलीची घेऊ नका ….का,मी येऊ त्यांच्याबरोबर ….एवढ मोठं व्यक्तिमत्व आणि हे ऐकून आंम्ही अवाक झालो…एवढं प्रेम हणमंतराव आप्पा वर मा. आण्णा चे होते…
त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे प्रेमळ, कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो आदरभाव ( देशमुख आडनाव व जातीचा जरा ही गर्व नाही ) ,कार्यतत्पर, धाडसी, विश्वासहर्ता आणि नियोजनबद्ध कार्य तसेच सर्व मोर्चे आंदोलन मध्ये बहुजन समाजाच्या खांद्याला खांदा लावून वर्णव्यवस्था, हुकुमशाही व रोख ठोक परखड बोलणारे व्यक्तिमत्व असे पैलू असणारे तालुक्याचे उमदे नेतृत्व म्हणजे आप्पा होय. या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर गारमेंट, कोल्ड स्टोरेज , कृषी प्रक्रिया संस्था, पेट्रोल पंप, हॉटेलिंग अशा विविध क्षेत्रात दमदार पाऊल टाकून त्यानी त्यांचा प्रगीतचा आलेख अग्रक्रमी ठेवला आहे.
महापुरुषांची जयंती, कोणाचे लग्न असो, दवाखाना असो, घरगुती अडचण असो, भांडण तंटे असो अथवा कोणतेही काम असेल तर त्यांच्या वाड्यातून माणूस रिकाम्या हाताने कधीच माघारी आलेला नाही. हे वास्तव आहे. त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी आहे. मला मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमत मोफत आरोग्य शिबीर (2011-12) घ्यायचे होते. त्यास मदत म्हणून पाच हजार रु मदत मनमोकळे पणाने संजय होवाळ सर व पोपट वाघमारे सर यांचे उपस्थिती मध्ये दिली. व काही ही अडचण असेल तर बिनधास्त सांगत जावा. असे म्हणून शाबासकीची थाप दिली…
विशेषतः मला दुबई येथे पुरस्कार मिळलेनंतर माझा विशेष सत्कार केला हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी फारच महत्वाचा व प्रेरणा देणारा होता.आपण आटपाडी मधील CAA/NRC या डॉ.गुरव सरांच्या परिसंवादास हजेरी लावली होती. आण्णा भाऊ साठे पुतळा प्रसंगी जाहीर मोर्च्यात आपण पाठिंबा दर्शविला होता. मी हे जवळून अनुभवले आहे …यावरून आपले व्यतिमत्व हे महापुरुषांचा विचार आचार प्रत्यक्षात रुजवणारे आपण समतेचे वारकरी आहात.
असे बहुआयामी व्यक्तिमत्व सामान्य व्यक्तीचे असामान्य नेतृत्व व दातृत्व म्हणजे माणदेशातील लोखंडास परीस बनवणारे मा.हणमंतराव आप्पा देशमुख होय असे म्हटलें तर वावगे ठरणार नाही..
आप्पा आपणास वाढदिवसाच्या मी व डॉ.पंचशीला शिवाजी वाघमारे (पत्नी) , लोंढे परिवार, सर्व मित्र SNP शाळा कॉलेज, सोशल संस्था, के पी जे एस नागरी अर्बन निधी व सर्व स्टाफ कडून वाढदिवसाच्या अनंत कोटीच्या मनपूर्वक शुभेच्छा…..!!!