राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विधायक उपक्रम
प्रतिनिधी /पोपट वाघमारे
आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे आटपाडी तालुका अध्यक्ष मा.हणमंतराव देशमुख यांचा वाढदिवस अनेक विधायक कार्यक्रम करून साजरा करण्यात आला.
आज रक्ताचा तुटवडा जाणवत आहे याचे गांभीर्य व कोरोना परिस्थिती पाहता तालुक्याचे उमदे नेतृत्व हणमंतराव देशमुख हे नाव विधायक कार्यात पुढे असते .आटपाडी तालुक्यातील दिव्यांग व गरजू लोकांना तसेच शेतकरी कष्टकरी लोकांच्या साठी कायम प्रशासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत. कोणत्याही रूग्ण ला आरोग्य चांगले राहावे म्हणून स्वतः पुढाकार घेऊन त्या रूग्णांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत असतात अशा या अवलीयाला वाढदिवसाच्या रूपाने आशिर्वाद देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त रक्तदान आयोजित केले होते. या शिबिरात शंभराहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवीला.तर आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान असावे याकरिता हणमंतराव देशमुख हेल्थ अँड हेल्प केअर सेंटर सुरू करण्यात आले याचा लाभ दिघांचीसह आटपाडी तालुक्यातील अनेक गरजू लोकांना होणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्धघाटन प्रसंगी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश पाटील (काका )सरचिटणीस बाळासाहेब पाटील (बापू )कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक (बापू )तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमूख उपाध्यक्ष शशिकांत भोसले अतुल जावीर समाधान भोसले अजिनाथ जावीर तसेच महिला मा सभापती सौ जयमाला देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जि उपाध्यक्ष अनिता पाटील तालुका अध्यक्ष अश्विनी कासार जि सदस्य सुजाता टिंगरे पं स सदस्य उषा कुटे(नानी ) पूजा गुरव ,वैशाली महेश वाघमारे,माजी सदस्य अश्विनी वाघमारे व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते