माळशिरस तालुक्यातील covid-19 या सुविधा उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांकडे अजय सकट यांची मागणी
माळशिरस प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील अकलूज ,माळशिरस, नातेपुते, वेळापूर या ठिकाणी विद्युत शववाहिनी मंजूर करणेसह विविध मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना माळशिरस तालुका पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी ऑनलाइन पाठवले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन अकलूज उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यावेळी गणेश रूपनवर उपस्थित होते दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या माळशिरस तालुका मध्ये covid-19 चा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर युक्त बेडची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध मागण्या पुढीलप्रमाणे सध्या तालुका व जिल्ह्यामध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली असून पुरवठा कमी असल्याने या इंजेक्शनचा योग्य तो रुग्णासाठी वापर व्हावा व त्याचा साठा उपलब्ध करावा त्याप्रमाणे सध्या कोव्हीडच्या पेशंटची मृत्युंचे प्रमाण वाढू लागले आहे त्यामुळे स्मशानभुमीमध्ये अनेक अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे अकलूज ,माळशिरस, नातेपुते, वेळापूर या प्रमुख गावांमध्ये विद्युत शववाहिनी तत्काळ मंजूर करावी त्याचप्रमाणे तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बॅड 283 व व्हेंटिलेटर 44 असून तालुक्याची लोकसंख्या जवळपास साडेपाच लाख असल्याने व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन युक्त बेडची संख्या शासनाने वाढवून द्यावी तसेच तालुक्यामध्ये लसीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यावा तालुक्यातील
कोव्हीड सेंटर येथे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदे त्वरित भरण्यात यावेत ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे DHCH सेंटर सुरू करण्यात यावे तसेच लवकरच सरकार लॉकडाउन करणार आहे त्यामुळे गरीब गरजूंना याकाळात अन्नधान्याची मदत करावी त्याचप्रमाणे गेली वर्षभर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संघर्षातून व प्रामाणिकपणे काम केले आहे तरी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासाठी सर्व सोयींनी युक्त कोव्हिडं उपचार केंद्र सुरू करण्यात यावे या मागण्या संदर्भामध्ये आपण योग्य ती तत्काळ दखल घेऊन मागण्या बाबत विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे