खुडूस व विझोरीच्या शिवेवर खुडूसकरांचे स्तुत्य रक्तदान शिबीर संपन्न..
उपसभापती अर्जुनदादांनी केले रक्तदान..
महेश घाडगे,
माळशिरस तालुका /प्रतिनीधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती समिती खुडूस निमगावपाटी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर रक्तदानावेळी कोरोना नियमांचे पालन करून सोशल डिस्टेनशिंग पाळण्यात आले होते.मास्क व सॅनिटाईजर वापरण्यात आले होते.
तसेच यावेळी खुडूस, निमगाव पाटी, विझोरी या गावातील 130 रक्तदात्यांनी रक्तदानासाठी सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खुडूस गावचे लोकनियुक्त सरपंच प्रा. विनायक ठवरे सर विझोरी गावचे सरपंच पोपट काळे विजयवाडी गावचे सरपंच उमेश भंडारे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे रिपाइंचे तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे, आप्पा काळे (चेअरमन) भिमराव काळे संचालक शिवामृत दूध संघ विझोरी, नाना काळे ग्रामपंचायत सदस्य विझोरी, बाजीराव काळे नवनाथ वाघमारे तात्या मोरे दादासो काळे गणेश यशवंत काळे नागेश काळे दगडू साहेब काळे बापू गाडे बाळासो काळे अण्णा वाघमारे मगन चव्हाण रामभाऊ वावरे माजी सरपंच मालोजी काळे, रजनीश बनसोडे, डॉ.कुमार लोंढे व त्यांचे सहकारी.उदयनगरचे माजी सरपंच सतीश शिंदे, विझोरी गावचे माजी सरपंच राहुल वाघंबरे, खुडूस गावचे माजी सरपंच अँड शहाजी ठवरे, डॉक्टर तुकाराम ठवरे, अँड .धनाजी ठवरे, अक्षय ब्लड बँकेचे चेअरमन संजयकुमार शिंदे, विझोरीचे डॉक्टर सचिन शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः रक्तदान करून कोरोना लढ्यात सर्वांनी रक्तदान करण्याचे आवाहन करून संयोजकाचे कौतुक केले सदर कार्यक्रमाचे संयोजक. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती खुडूस