प्रतिनिधी/पोपट वाघमारे
आटपाडी तालुक्यातील दिघची येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९४-व्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी मठ दिघंची येथे कोरोना-चे नियम पाळून श्री. भाग्यवंत सुतार व श्री. सोपान (काका) काळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली .
त्यावेळी उपस्थित ओबीसी संघटनेचे जिल्हा-अध्यक्ष श्री सावंत (मामा) पुसावळे, ग्रा. पं. सदस्य श्री. चंद्रकांत पुसावळे, भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्री. प्रशांत (पिंटू) शिंदे, प्रशांत चोथे, श्री. कबीर गुरुजी, श्री. हेमंत पेंन्टर, श्री. वसंत यादव, श्री. मोहन शेंडे, बाळू ढोक, अरूण पुसावळे या सर्वांनी प्रतिमेला पुष्प वाहून “जय ज्योती-जय क्रांती” घोषणा देऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महिला गारमेंट दिघंची येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन साबिर खान यांच्या हस्ते झाले.यावळी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.