आज दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. गौतम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला विद्यार्थी श्री सुजित हेगडे यांचा पी एच डी व्हायवा महाविद्यालयातून ऑनलाइन पद्धतीने यशस्वीपणे पूर्ण झाला.आणि त्यांना शिवाजी विद्यापीठाची पी.एच.डी. पदवीची घोषणा करण्यात आली. महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रयोगशाळेच्या आधारावर पी एच डी करणारे ते पहिले विद्यार्थी ठरले आणि महाविद्यालयातून पी एच डी मार्गदर्शन करून पहिला मार्गदर्शक होण्याचा बहुमान डॉ. गौतम गायकवाड यांनी प्राप्त केला.याबद्दल डॉ. गौतम गायकवाड यांनी संस्थेचे संस्थापक श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे चेअरमन मा. अमरसिंह बापूसाहेब देशमुख व सर्व पदाधिकारी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक – प्राध्यापिका यांना धन्यवाद दिले आहेत.
डॉ. गौतम गायकवाड व डॉक्टर सुजित हेगडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा