माळशिरस प्रतिनिधी/ कोरोनाचे अस्मानी संकट व रक्ताचा तुटवडा या पार्श्वभूमीवर क्रांतिसूर्य महात्मा फुले व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिनांक 11 एप्रिल रविवार रोजी 9 ते 4 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन लोकनेते भीमराव तात्या सावंत प्रतिष्ठान तर्फे नालंदा बुद्ध विहार माळशिरस येथे केले असल्याची माहिती युवा नेते आकाश सावंत यांनी दिली.
रक्तदात्यास अडीच लाख ( 2.50 लाख) रु चा विमा अथवा आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे .रक्तदात्यांनी येताना पॅन कार्ड व आधार कार्ड आणणे महत्वाचे आहे.जास्तीत जास्त युवक वर्गांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकनेते भीमराव तात्या सावंत प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.