माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी पतपेढी पुणे. चे अध्यक्ष व एस एस सी बोर्ड पुणे चे अधिकारी मा. राजेश जावीर साहेब व पतपेढी चे संचालक मंडळ यांनी पतपेढी च्या वतीने परिवर्तन एजुकेशन सोसायटी संचलित परिवर्तन पब्लिक स्कूल पलूस व परिवर्तन पब्लिक स्कूल रबाळे भीमनगर नवी मुंबई ला शैक्षणिक खर्चासाठी पन्नास हजार रुपये (50 000).. देणगी म्हणून दिले.. त्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार….. आपण चालवत असलेल्या शाळेत सामान्य मुलांसह अत्यंत गरजू, भटके, निराधार, मागास, दुर्लक्षित, विद्यार्थी शिक्षण, प्रशिक्षण घेतात.. या कामाबद्दल एस एस सी बोर्ड चे अधिकारी माननीय राजेश जावीर साहेब यांना खूप तळमळ होती. स्वतः त्यांनी अनेकदा मदत केली व मार्गदर्शन केले.. कौतुक केले. त्यांनी शाळेला मदत मिळावी म्हणून पतपेढी चे उपाध्यक्ष सुरवसे साहेब, सचिव भावे मॅडम, विश्वास कवटकर, अजय पवार, मनोज शिंदे, रमेश शिंदे, संजय रसाळ, निता ववले, व सावंत साहेब या संचालक मंडळासमोर देणगीचा प्रस्ताव मांडला.. संचालक मंडळाने मा. राजेश जावीर साहेबांचा मान राखून 50000 (पन्नास हजार रुपये )देणगी दिली..त्याबद्द्ल आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते बहुजन समाज पार्टी चे नेते मा व परिवर्तन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा. दत्ता हेगडे यांनी सर्व संचालकांचे व विशेषतः जावीर साहेबांचे आभार मानून वंचित समाजाच्या मुलांसाठी असेच कार्य करणार असल्याचे नमूद केले 996020994