पिलीव येथील बँक ऑफ इंडियाचा भोंगळ कारभार- सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी दिला टाळा ठोकण्याचा इशारा!
माळशिरस प्रतिनिधी/माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे बँक ऑफ इंडिया ची शाखा असून या बँकेत हिंदी बोलणारे जास्त व मराठी समजणारे कमी आहेत .येथील खातेदारांना वेळेवर पासबुक प्रिंट करून मिळत नाहीत? मार्च अखेर असल्याने खातेदारांची ससेहेलपट होत असताना हिंदी बाबूंना त्याच काय घेणं देणं नाही? कधी सांगतात इंटरनेट बंद आहे ? तर कधी यांचा प्रिंटर बंद असतो? सर्वसामान्य खातेदार व बँकेची अनेक वेळा बाचाबाची सुद्धा झाली आहे.
मागील वेळेस जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे ,राहुल मदने,सुजित सातपुते यांनी आवाज उठवला होता तरी पण बँकेतील बाबूशाहीचा थाट कमी येताना दिसत नाही.
जे लोक BOI APP वापरतात त्यांना तर 2019 पासून एन्ट्री दिल्या नाहीत ही बाब अक्षम्य व ग्राहकांची अडवणूक करणारी आहे.
कोरोना काळात एक पासबुक वर एन्ट्री घेण्यासाठी चार चार हेलपाटे मारावे लागत असतील व एन्ट्री पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील अशी उत्तरे येत असतील तर हा खातेदार व ग्राहक यांचा मूलभूत डावलण्याचा प्रकार आहे.
याबाबत रीतसर लेखी तक्रार सेंट्रल ह्यूमन राईट चे संस्थापक डॉ.कुमार लोंढे यांनी सदरचा प्रकार व गाऱ्हाणे ची लेखी तक्रार त्यांच्या वरिष्ठ कार्यलयास केली आहे.
बँकेतील कर्मचारी यांनी कार्यलयीन कामकाज आणि खातेदारांची अडवणूक केल्यास अथवा नागरिकांना,जेष्ठ नागरिकांना त्रास दिल्यास बँकेस टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.