थेट आएएस अधिकाऱ्याने घेतली दखल
दरम्यान, शेतकऱ्याच्या या शेतीची दखल थेट आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी घेतली आहे. याच कारणामुळे हॉप-शूट्सच्या शेतीची चर्चा संपूर्ण भारतभर होतेय. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हॉप-शूट्स ही जगातील सर्वात महागडी भाजी असून औरंगाबाद जिल्ह्यातील अमेरश सिंह हे या भाजीची शेती करतात. अशा प्रकारची शेती करणारे भारतातील ते पहिलेच शेतकरी आहेत.
सुप्रिया साहू यांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची शेती ही भारतीय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते.