मुंबई : गृहमंत्री देशमुख यांच्यावर बार आणि हॉटेल्सकडून १०० कोटी रुपयाचा हप्ता वसुलीचा प्रकरण समोर आल्यांनतर पोलीस खात आता खडबडून जाग झाला आहे. त्यात आता अवैध धंदे जर चालू राहिले तर परिणामाची तयारी ठेवा. पुरावे सापडल्यास अगदी साध्या शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे.
रेस्टॉरंट बार, ऑर्केस्ट्रा, पब्स, डिस्को थेक्स, मसाज सेंटर, हुक्का पार्लर, कुंटणखाने, जुगार, दारूचे अड्डे इत्यादी अवैध धंदे जर चालू राहिले तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱयांनीही लक्षात ठेवावे.
कुणी हॉटेलवाले किंवा कोणत्याही आस्थापनाच्या मालकांनी नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असा ठोस दम देताना नांगरे पाटील यांनी इशारा दिला आहे की, अवैध धंदे १०० टक्के मला बंद हवेत. आता ‘झीरो टॉलरन्स’! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे तसे आदेशच आहेत. आता कुणाची गय केली जाणार नाही, असाही इशारा नांगरे पाटील यांनी दिला आहे.