रक्ताच्या गुठळ्या Blood clot: या ८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष-डॉ. स्मिता ढेरे (मुंबई)
आजच्या धावपळीच्या युगात तबेतीची काळजी महत्वाचे आहे.अनेकदा शरीरात ब्लड कॉट (Blood Clot) होणं हे चांगलं मानलं जातं. जेव्हा तुम्हाला दुखापत होते तेव्हा क्लॉट रक्त प्रवाह थांबवतं. मात्र हा क्लॉट कधी कधी तेव्हा होतो जेव्हा त्याची अजिबातच गरज नसते. ब्लड क्लॉट तेव्हा खतरनाक असतो जेव्हा तो मासपेशी जवळ नसांमध्ये तयार होतो. यामुळे ब्लड फ्लो रोखला जातो. ज्यामुळे जीवाला खूप मोठा धोका असतो. जाणून घेऊया ब्लड कॉटची काय लक्षणं आहेत. हे आपण जाणून घेऊ मुंबई येथील प्रसिद्ध डॉ.स्मिता ढेरे यांच्याकडून
🎯 *हाता-पायांना सूज*
हाथा-पायांना सूज येणं हे ब्लड कॉटचं पहिलं लक्षणं आहे. ब्लड कॉटमुळे हाता-पायांच्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. कधी कधी पाय आखडतात किंवा मासिक पाळी दरम्यान पायांना सूज येते हे सामान्य आहे. मात्र कायमच दुखापतीसोबत सूज ही एक समस्या आहे. यासाठी तुम्हाला डॉक्टरशी संपर्क साधावा लागेल.
🎯 *हाता-पायांना दुखापत*
सामान्यपणे ब्लड कॉटमध्ये सूज आणि त्वचा लाल होणे यासारखी लक्षण पाहायला मिळतात. मात्र कधी कधी हाता-पायांना सूज येणं यासारखे त्रास देखील जाणवतात. अनेकदा या दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र पुढे यातून काही तरी विपरित निर्माण होऊ शकतं.
🎯 *त्वचा लाल होणे*
एखाद्या जखमेवर रक्तं गोठलं जातं. यामुळे त्वचेचा रंग लाल दिसतो. यामुळे त्रास करून घेऊ नका मात्र नसांमध्ये ब्लड कॉट असल्यामुळे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात. या भागाला हात लावल्यावर गरम जाणवतं.
🎯 *छातीत दुखणे*
छातीतल्या दुखण्याला आपण सामान्यपणे हार्ट अटॅक समझतो. मात्र हे पल्मोनरी एम्बोलिज्मची लक्षणे आहे. यामध्ये फुफ्फुसातून जाणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लड कॉट असू शकतं. पल्मोनरी एम्बोलिज्मचे दुखणे खूप जोरात असते. अगदी श्वास घेतल्यावरही त्रास होतो. अशा स्थिती डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
🎯 *श्वास घेताना त्रास जाणवतो*
फुफ्फुसात रक्ताच्या गाठी जमा झाल्यामुळे ऑक्सिजनचा फ्लो कमी होतो. यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे शरीरातूनच मुळात ऊर्जा मिळत नाही. अगदी जिने चढले तरी दम लागतो. ही अशी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.
🎯 *सतत खोकला लागणे*
सततचा खोकला हे देखील ब्लड क्लॉटचं लक्षण आहे. हेल्थ एक्सपर्टनुसार, छातीत दुखण्यासोबतच तुम्हाला खोकला देखील लागू शकतो. यामुळे कधी कधी खोकल्यातून रक्त देखील पडू शकतं.
*🎯हृदयातील ठोके वाढणे*
ऑक्सिजनचा फ्लो कमी झाल्यामुळे हृदयाची ठोके वाढू शकतात. यामुळे छातीत दुखू देखील शकतं. यामुळे श्वास घेण्यास अडसर निर्माण होऊ शकते. हे पल्मोनरी एम्बोलिज्मच्या दुखापतीचे संकेत असू शकतात. छोटासा ब्लड कॉट देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात.
ब्लड कॉट असल्यामुळे फुफ्फुसातून केमिकल निघू लागतं. ब्लड ऑक्सिजनमध्ये बदल पाहायला मिळतात. ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचे रेट वाढू लागले आहेत. यामुळे अचानक चक्कर येण्याची शक्यता असते. हे ब्लड क्लॉटची सामान्य लक्षणे आहेत.
वरील पैकी लक्षणे असतील अथवा वयाच्या चाळीशीनंतर अशा टेस्ट व योग्य ते औषधोपचार घेतल्यास भविष्यातील धोका तुम्ही टाळू शकता डॉक्टर यांच्या सल्याने आपण ट्रीटमेंट ही करू शकता….धन्यवाद
लेख आवडल्यास नक्की शेअर करा