दिल्लीत भाजपा नेत्याने गळफास घेत केली आत्महत्या
दिल्लीत एका भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वॉकसाठी आलेल्या स्थानिकानी पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. जी एस बावा असं या भाजपा नेत्याचं नाव असून भाजपाचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.