भाजपची प्रतिमा अनेक प्रकरणात मलीन होत असल्याने पाऊल ?
प्रतिनिधी:सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील नामांकित कुटुंब असलेल्या मोहिते पाटील यांच्या घराण्यातील युवा नेत्याने कृष्णा भीमा विकास आघाडी च्या नावाने पक्ष स्थापन करण्यासाठी शासनदरबारी प्रस्ताव दाखल केला आहे,हा युवा नेता हा भाजपचे विद्यमान आमदार,माजी खासदार रणजित सिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत,आणि तेच या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत,
या पक्षाचे अध्यक्ष होणाऱ्या युवा नेत्याला आपले वडील हे भाजपच्या कोट्यातून आमदार झाले आहेत याची पूर्व कल्पना असणारच आहे,परंतु कृष्णा भीमा विकास आघाडी च्या नावाने पक्ष स्थापन करून त्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार आहेत,असे अनेक प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या आहेत.
विद्यमान भाजप आमदाराचा मुलगा एखादा पक्ष काढतो म्हटल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आणि भाजपवाशी झालेले मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य या पक्षामध्ये सामील आहेत का नाहीत हे गुलदस्त्यातच आहे,मोहिते पाटील कुटुंब भाजप पक्षापासून फारकत घेणार आहेत का?अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत,महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार चे नाव हे खराब झालेले आहे,हे यांच्या लक्षात आले आहे का?किंवा भाजप पक्षाची प्रतिमा मलीन झाली असल्याची भावना मोहिते पाटील यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे का? त्यामुळे भाजपवाशी झालेल्या मोहिते-पाटील यांनी हा नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे का?तसेच मोहिते पाटील हे भाजप पासून फारकत घेणार का?अशीही चर्चा रंगताना दिसत आहे.
येणाऱ्या काळात मोहिते पाटील कुटुंबाच्या निर्णयावर भाजपा, राष्ट्रवादी व संपूर्ण जिल्ह्याच गणित बदलणार हे मात्र नक्की आहे? अलीकडेच राष्ट्रवादी चे नेते उत्तम जानकर यांनी ही पक्षातील निवडी या अकलूजच्या मार्जितल्या व्यक्तीच्या होत आहेत . हे समीकरण काळच ठरवेल.