आटपाडी तालुका प्रतिनिधी/पोपट वाघमारे
दिघंची येथील डॉक्टर स्वरूप सतीश रावण यांना भूल शास्त्र या शाखेत कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन विद्यापीठाने दोन सुवर्ण पदकाने गौरविले.
डॉक्टर स्वरूप यांनी सन 2021 या वर्षातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ठाणे येथे भूल शास्त्र विषयाचे शिक्षण घेत असताना सलग तीन वर्षाच्या परिश्रमाने भूल शास्त्र या पदवी त् प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल हे सुवर्णपदक मिळाले. डॉक्टर स्वरूप दिघंची तालुका आटपाडी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत रावण व डॉक्टर अंजली रावण यांचे पुतणे आहेत. लहानपणापासूनच डॉक्टर रावण यांना मेडिकल क्षेत्राची आवड आपले चुलते डॉक्टर प्रशांत रावण यांच्यामुळे निर्माण झाली.दिघंचीतील रावण कुटुंबाने आटपाडी तालुका दुष्काळग्रस्त असताना ही वैद्यकीय क्रांती घडवून आणली. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागातील हॉस्पिटलमध्ये न जाता दिघंची सारख्या निमशहरी गावात सुविधा उपलब्ध करून दिल्या. डॉक्टर यांनान त्यांचे काका डॉक्टर प्रशांत व डॉक्टर अंजली रावण यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.आज दिघंची सारख्या ग्रामीण भागात डॉक्टर प्रशांत रावण व अंजली रावण यांनी मुलगा डॉक्टर आदित्य रावण यांना एमडी मेडिसिन करून ते आता हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथे सेवा बजावत आहेत तर पुतणे डॉक्टर स्वरुप दिघंची आटपाडी तालुक्यात लोकांची सेवा करत आहेत तसेच डॉक्टर अमृत रावण हे फिजिओथेरपीच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील वयोवृद्ध ,युवक ,खेळाडू या लोकांची सेवा बजावत आहेत या तिन्ही बंधूनी डॉक्टर प्रशांत रावण यांना आदर्श ठेवून व मेडिकल स्टोर चे अनुप रावण यांच्या आदर्शाने दिघंची व परिसरामध्ये वैद्यकीय क्रांती घडवून आणली डॉक्टर स्वरूप यांच्या यशाच्या कौतुकाने विविध मान्यवरांनी व परिसरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.