जगात अनेक प्रकारची लोक आहेत साप आणि विंचवाच्या दंशामुळे मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे या प्राण्यांची आपल्याला भीती वाटते, मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. एक अशी व्यक्ती आहे की, जी या विषारी प्राण्यांसोबतच राहते. या अतिविषारी प्राण्यांनी या व्यक्तिला करोडपती बनवले आहे.
इजिप्तची राजधानी काहिरा येथे राहणारे मोहम्मद हमदी बोश्ता यांना विंचू आणि साप या वन्यप्राण्यांनीच श्रीमंत बनवले आहे. त्यांना आपल्या देशातील रेगिस्तानी आणि तटीय प्रदेशात आढळणारे साप आणि विंचू पकडण्याचा छंद होता. त्यांच्या छंदामुळे त्यांना एके दिवशी एक कल्पना सुचली. यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले.
थक्क करणारी गोष्ट म्हणजे मोहम्मद हमदी बोश्ता यांनी आतापर्यंत चक्क 80,000 विंचू आणि साप पकडले आहेत.
या विंचू आणि सापांसोबत ते राहतात. विशेष म्हणजे सामान्य माणसाला या प्राण्यांपासून वाटणारे भय यांना अजिबात वाटत नाही. उलट या प्राण्यांमुळे त्यांचे नशीब उघडले आहे.
त्यांनी पकडलेल्या साप आणि विंचवाचे विष विकून मोहम्मद बोश्ता काही सेकंदातच लाखोंची कमाई करतात. ते एक ग्रॅम विष 10, 000 डॉलरना विकतात. हिंदुस्थानी रुपयांत या विषाची किंमत 73 लाख रुपये आहे