प्रतिनिधी/ पोपट वाघमारे
चालू हंगामातील 2020, 21मधील शासन नियमाप्रमाणे एफ आर पी ऊस बागायतदार शेतकऱ्यांना द्या असे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उमेश देशमुख यांनी श्री श्री सद्गुरु रविशंकर कारखाना राजेवडी यांना दिले आहे. शासन निर्णयाप्रमाणे 2850 एवढी एफआरपीप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याला ऊस घातला आहे त्यांना पंधरा दिवसात एफ आर पी देणे बंधनकारक आहे .अन्यथा पंधर दिवसानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यावर व्याजासह रक्कम जमा करण्यात यावी असे डॉक्टर उमेश देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.
एक रकमी रकमेचे टप्पे केले तर व्याजासह रक्कम देण्यात यावी आपण जर शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पंधरा दिवसात जमा केली नाही तर आमची बळीराजा शेतकरी संघटना दहा एप्रिल पासून आपल्या कारखान्याच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन उभारेल असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर उमेश देशमुख यांनी दिला आहे.यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष डॉ दिगंबर मोरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष जयंत गायकवाड, जिल्हा सचिव अशोकराव गायकवाड, जिल्हा युवा अध्यक्ष सागर चव्हाण, युवा जिल्हा उपाध्यक्ष अमितराव गिड्डे, युवा नेते मंगेश रणदिवे उपस्थित होते.