प्रतिनिधी/पोपट वाघमारे
कोरोना प्रतिबंधक लसीकरण अंतर्गत दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्र हे अग्रेसर असून गेल्या दहा दिवसापासून दररोज किमान शंभर लोक या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस घेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक 45 वर्षाच्या वरील बी पी व शुगर असणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले असून त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र दिघंची कार्यक्षेत्रामध्ये 14 गावे असून आठ ते साडे आठ हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.तरी सर्व जेष्ठ नागरिक यांनी लस घेण्यासाठी दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक पवार यांनी केले आहे.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉक्टर व त्यांचे स्टाफ मेडिकल शॉप, ग्रामपंचायत कर्मचारी, पंचायतराज मेंबर्स ,पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ,शिक्षक व इतर संस्थांमधील काम करणारे फ्रन्टलाइन कर्मचारी यांना प्राधान्य दिले जात असून बऱ्याच जणांनी लस घेतली आहे .तरी अजून काही लोक लसीपासून वंचित राहिलेले आहेत .
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनायक पवार व डॉक्टर सुरज पवार व इतर सर्व स्टाफ लसीकरण मोहिमेसाठी सज्ज असून दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबवली जात आहे तरी दिघंची व दिघंची परिसरातील 45 वर्षे वय वर्षावरील व जेष्ठ नागरिक यांनी लस घ्यावी असे आवाहन करण्यात आले .सध्या वापरत असलेली लस अतिशय कार्यक्षम असून जवळजवळ दीड हजार लोकांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लाभ घेतलेला आहे. एकाही रुग्णांना या लसीचे दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील समाधानी लसीकरण लाभार्थी दररोज आपल्या मित्रांना व आपल्या नातेवाईकांना लसीकरणासाठी घेऊन येत आहेत हे अत्यंत समाधानाची बाब आहे.
जिल्हा परिषद सदस्य श्री मोहन भाऊ रणदिवे पंचायत समिती सदस्य सौ सरगर तसेच पंचायत समिती सदस्य सौ उषा कुटे त्यांचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून लसीकरण मोहिमेमध्ये सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सर्व आजी माजी पदाधिकारी सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे तरी सर्वांना असे आव्हान करण्यात येते की आपल्या स्तरावरून या लसीकरण मोहिमेसाठी लाभार्थी प्रवृत्त करण्यासाठी सहकार्य करावे .
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की लसीकरण मोहिमेला साथ द्या सध्या करुणा चा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण लवकरात लवकर करून घेणे तसेच करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास वापर करणे सोशल डिस्टंसिंग पाळणे गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे काही लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आपली तपासणी करून घेऊन उपचार करून घेणे आणि आपली काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे
उन्हाळा वाढत आहे त्यासोबत करुणा चे रुग्ण सुद्धा वाढत आहे लसीचे दोन डोस एक महिन्याच्या अंतराने घेतल्यानंतर पूर्ण क्षमतेने रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते हे सर्वांच्या बाबतीत लवकरात लवकर घडावे म्हणून लसीकरणासाठी लवकरात लवकर आपल्या घरातून सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन येऊन सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक पवार यांनी केले आहे.