जळगाव :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या आदेशाप्रमाणे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी.किंवा ओएव्हिएमद्वारे तात्काळ घेण्याबाबत राज्यातील पतसंस्थांच्या सर्व जिल्हा सहकारी फेडरेशन यांना कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरी / ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना आणि पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था त्याचप्रमाणे उर्वरीत सर्व सहकारी संस्थांनी सन 2020-21 या वर्षातील त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021 च्या आत घ्यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनाने आदेशीत केलेल्या अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संतोष बिडवई यांनी कळविले आहे.