आटपाडी तालुक्यातील दिघची गावचे आंतराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक, माझे अत्यंत जिवाभावाच्या जोडीदारांपैकी एक,मित्र,माझी पत्नी डॉ.पंचशीला (वाघमारे)लोंढे चे क्लासमेंट व भाऊ, धाडसी,ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार आणि ज्यांनी प्रत्यक्ष यमराजास हुलकावणी देऊन त्याच्या बेंबीस चिमटा घेऊन मी किती जागृत आहे हे सिद्ध करून…सारीपटलाच्या जीवनात यमराज व रेडा या दोघांस चितपट करणारा आखाडयातील तेल लाववलेला पैलवान होय. मरणावर ही विजय प्राप्त करणारे मा.पोपट वाघमारे सर होय.
कोरोना काळात स्वतःचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असताना सुद्धा हसत खेळत कोरोनाला पुरता खजील करून सहकाऱ्यांसह कोरोना योद्धा म्हणून विजय मिळवला त्यांनी शूट केलेला व्हिडीओ म्हणजे कोरोनाचे व जगण्याचे वास्तव होय.
आज कराटे क्षेत्रात त्यांचे प्रशिक्षक मा.जितकर सर व सहकारी संजय होवाळ सर यांचे सानिध्यात हजारो युवक युवती महाराष्ट्र, देश पातळीवर व आंतराष्ट्रीय स्तरावर नाव उज्वल करत आहेत आणि पायाने अपंग असूनसुद्धा पोपट सर शंभर मुलांचा कराटे क्लास कै. धोंडीसाहेब सभागृहात अविरपणे चालवतात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही एवढी जबरदस्त इचशक्ती त्यांच्यामध्ये उपजतच आहे.
पाठीमागील वर्षी पुन्हा एक पायाचे ऑपरेशन झाले .४५ दिवस सांगलीत ऍडमिट असताना पायातील इन्फेक्शन, असहाय्य वेदना ,पायाला मास कट करून पडलेला खड्डा, सांगलीच्या डॉक्टर यांचे शर्थीचे प्रयत्न करून पुन्हा जसा आहे तसा पाय पूर्ववत झाल्याने सर्वानाच सुखद अनुभव आला….या सर्व दुःखाच्या काळात आर्थिक चणचण तर भासणारच ! पोपट वाघमारे सर म्हणतात –
‘राष्ट्रवादी चे आटपाडी तालुका अध्यक्ष व दीघांची गावचे विकास पुरुष हणमंतराव देशमुख माझ्या अडचणीच्या काळात देवदूतासारखे धावून आले.. मला व आमच्या कुटुंबास सांगितले काळजी करण्याचं काम नाही पोपट चा पाय बरा होणार नाही तोपर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घ्यायचा नाही …पैशाची काळजी करू नका …एवढे दातृत्व राजकारणाच्या पलीकडले जगणारी माणसे म्हणजे देवदूतच आहे असे ते सांगतात.”
पुन्हा नव्या हिमतीने पोपट वाघमारे या व्यक्तीने खचून न जाता दहा दिवसातच कराटे क्लास चालू करून दाखवून दिले…
पंखोसे कुछ नही होता ….होसलो की उडन होनी चाहीए
प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट शक्य आहे हे त्यांच्याकडे बघून जाणवते.जबरदस्त अपघातून वाचून मांडीचा तुकडा पडलेला ,दोन ते तीन इंच पाय कमी असणारा, चार ऑपरेशन अयशस्वी असून यत्किंचितही आत्मविश्वासही न ढळलेला पायाची जखम बघून सहानभूती दाखवणाऱ्यास उलट धीर देणारा
हा उमदा तरुणतुफानातील दिव्यापेक्षाकाही कमी नाही..
आयुष्याकडे सकारात्मक ,विनोदी बुद्धीने व हसत खेळत जगणारा स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात सुख पेरणार व्यक्तिमत्त्व…
कधी जास्त ताण असेल बेचैन वाटेत असेल तर टेन्शन फ्री ठिकाण म्हणजे आटपाडी दिघची व पोपट सर होय.हा व्यक्ती अजब आहे…
डॉकुमारलोंढे डॉ.पंचशीला वाघमारे लोंंढे
●अध्यक्ष सोशल संस्था ●kpjs नागरी अर्बन बँक
●Snp school college chandrapuri ● अंकुर हॉस्पिटल
email-janvidrohi@gmail.com
Visit: www.janvidrohi.com
Mo.9881643650