मेदड गणातील प्रजिमा 177 रस्ता मंजुरीसाठी सदस्य सौ प्राजक्ता स्वप्निल वाघमारे यांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी मागणी केली होती सदर रस्त्याची गरज ओळखून पंचायत समिती निवडणूक झाले पासून सातत्याने समितीत सत्ता नसताना देखील 1 ऑगस्ट 2017 रोजी कचरेवाडी तिरवंडी चाकोरे रस्ता व्हावा यासाठी सभागृहात ठराव क्रमांक. 88 ने मंजुरी घेतली होती.
तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर रस्ता व्हावा यासाठी ग्रामपंचायत ठराव मंजूर करून मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे सन 2020 रोजी निवेदन रुपी थेट मागणी केली होती.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना माननीय दत्ता (मामा) भरणे यांच्याकडेही सातत्याने या रस्ता विषयी पाठपुरावा सौ. वाघमारे व युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी केला होती. याचेच फलित म्हणून महाराष्ट्र शासनाच्या चालू 2020- 21 अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर तामशिदवाडी- मारकडवाडी – तिरवंडी – कचरेवाडी (प्रजिमा 177) किमी 0/000 ते 15/000 साठी रुपये 150.00 लक्ष मंजूर करण्यात आले. सदर रस्त्यासाठी माळशिरस विधानसभा आमदार श्री राम सातपुते तसेच श्री उत्तमराव जानकर यांनी देखील प्रयत्न केलेले होते.
माळशिरस तालुक्यातील अविकसित पश्चिम भागातील गावांना व खेडे वस्त्यांना जोडणारा हा प्रमुख जिल्हा मार्ग मंजूर झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे व महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.
Congratulations