प्रतिनिधी/पोपट वाघमारे
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील नवनाथ वसंत रणदिवे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने सकाळी 10.30 वाजता निधन झाले. ते दिघंची परिसरात वादन या कलेत प्रसिद्ध कलाकार होते.त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुले व भाऊ असा मोठा परिवार आहे.
सतत हसतमुख चेहरा हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि मनमिळाऊ स्वभाव तसेच कलेच्या क्षेत्रात सुद्धा ते अव्वल असेच होते.लोकसंपर्क व संघटन कौशल्य यामध्ये आघाडीवर होते.
कलाकार क्षेत्रासह ,सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांच्या अकस्मात जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
.