माळशिरस तालुका प्रतिनिधी-
माळशिरस तालुक्यातील गारवाड चांदापूरी येथील डॉक्टर सौ.डॉ.पंचशीला लोंढे मॅडम यांना त्यांच्या आरोग्य,शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल जागतिक महिला दिनांनिमित्त नारी शक्ती पुरस्कार केन्द्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्ली चे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.अनिल निकंबे,यांच्या हस्ते अंकुर हॉस्पिटल चांदापुरी ता.माळशिरस येथे प्रदान करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते व अकलूज प्रांत अधिकारी शमा पवार यांना ही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ.पंचशीला लोंढे म्हणाल्या की “हा पुरस्कार म्हणजे पाठीवर शाबासकीची थाप आहे. आम्ही जे सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे काम करत आहोत याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे असंख्य हात समाजामध्ये आहेत याचा सार्थ अभिमान आम्हास वाटतो. येथून पुढील काळात सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये माझे पती डॉ.कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली असेच काम करीत राहणार आहोत त्यासाठी समाजातील असंख्य हाताची गरज आहे. बदल एक व्यक्ती घडवत नसून समाज हा त्याचा पाठीराखा व पोशिंदा असल्याचेही त्यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे कामाची पोचपावती व ऊर्जा देणारा आहे .
यावेळी सदाशिव निवासी प्रशाला व व ज्यू कॉलेजचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे ,श्रीपुर येथील डॉक्टर मंडळी,जय मल्हार चे अरुण बोडरे,केपीजेएस चे संचालक बाळासाहेब काटे,प्रवीण देठे,राजू खरात सर,वैभव लोंढे इ मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्काराबद्दल मानवाधिकार संघटन व अण्णासाहेब निकंबे यांचे मॅडम यांनी आभार मानून आरोग्य क्षेत्रात अशीच व दर्जेदार सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल अशी सेवा देऊन ग्रामीण भागातील लोकांची सेवा करणार असल्याचे नमूद केले.विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी पुरस्कार मिळलेबद्दल सुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
छान