जनविद्रोही प्रतिनिधी /साकोळच्या बौद्ध तरूणीचा लातुरात खून!
लातूर येथे खाजगी रुग्णालयात काम करुन एल. एल. बी चे शिक्षण घेणाऱ्या बौद्ध तरुणीचा खून झाल्याचे समोर येथ असुन तीच्या सोबत रुग्णालयात काम करणाऱ्या एका तरुणास अटक करण्यात आली असून एक तर्फी प्रेमातून ही हत्या झाली आहे.
साकोळ ता. शिरूर अनंदपाळ येथील 24 वर्षीय अश्विनी आपले डि. एम. एल. टी चे शिक्षण पुर्ण करुण लातुर येथील कवठाळे हॉस्पिटल मध्ये लँब टेक्नीशयन म्हणुन काम करीत होती. याच बरोबर ती दयानंद विद्यालयात एल. एल. बी. चे शिक्षण घेत होती. मात्र कवठाळे रुग्णालयात काम करणारा किरण नेलकळे हा तरुण तीला सारखा शाररीक व माणशीक त्रास देत लग्नाची मागणी करीत होता. त्याच्या एकतर्फी प्रमामुळे अश्विनी खचली होती. तीने लातुर सोडून थेट गाव गाठले होते. ती घटनेच्या चार दिवसापुर्वी लातुरात आपल्या मैत्रिणी सोबत राहत होती. मात्र दि. 1 मार्च रोजी महादेव कांबळे रा. साकोळ यांना दुपारी 3.30 च्या सुमारास फोन करुन किरण पुन्हा त्रास देत असल्याचे सांगितले त्यांनी किरणचा नंबर घेवून बोलले. अश्विनी त्रास न देण्याचा दम दिला व अश्विनीस उद्या म्हणजे 2मार्च रोजी सकाळी नऊ च्या गाडीने साकोळला येण्यास सांगितले. मात्र दुसऱ्या दिवसी तीचा मृतदेह एमआयटी कॉलेजच्या पाठिमागे रेल्वे लाईनवर सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत अश्विनीच्या वडीलांनी दिल्या माहितीच्या आधारे या प्रकरणी अरोपी किरण यास अटक करण्यात आली.
पीडित तरुणीचा खून झाला असून यातील सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत. सर्व आरोपीना फाशी झालीच पाहिजे.
ती त्याला म्हणत होती त्रास देऊ नको मला शिकायचंय. त्याने तिला हळहळ करून मारून टाकलं. महाराष्ट्रात दलित मुली सुरक्षित नाहीत. आरोपीना फाशी झालीच पाहिजे!
अशी मागणी पँथर सेनेचे दिपकभाई केदार यांनी केली आहे